शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकीत बिले आधी द्या : मंत्री अग्रवाल

हापुड : भाकियू संघर्षचे राष्ट्रीय अध्यक्ष सरनजीत गुर्जर यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ते तथा प्रदेशाध्यक्ष इरकान चौधरी, आदेश प्रधान, डॉ. राजेश चौहान, रोहित मोरल, गजेंद्र चौहान आदींनी जिल्हाचे प्रभारी मंत्री कपिल देव यांची लखनौमध्ये भेट घेतली.

सिंभावली साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे सुमारे २६० कोटी करुपये थकीत आहेत अशी माहिती सरनजीत गुर्जर यांनी दिली. हायकोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याकडून वसुली केली तर ते शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरेल असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी आपल्या थकीत ऊस बिलांसाठी चिंतेत असल्याचे भाकियूने सांगितले. इरकान चौधरी यांनी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीसह ऊसाच्या थकीत बिलांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास प्राधान्य द्यावे असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here