मोरना साखर कारखान्याकडून पूर्ण ऊस बिले अदा

मुजफ्फरनगर : मोरना येथील दि गंगा किसान सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मधील सर्व ऊस बिले अदा केली आहेत अशी माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक कमल रस्तोगी यांनी दिली. हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

दुसरीकडे साखर कारखान्याने मंगळवारी सकाळपर्यंत आपल्या क्षमतेचा १०३.२२ टक्के वापर करून १२,७९,५०० क्विंटल उसाचे गाळप केले आहे. येथील साखर उतारा ९.८१ टक्के असून १,२२,१७० क्विंटल पोती साखर उत्पादन करण्यात आले आहे. आज अखेर साखर उतारा १०.५० टक्के आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला साफ ऊस पाठवावा असे आवाहन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आणि प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here