‘एनव्हीपी शुगर’कडून सोळाव्या दिवशी ऊस बिले अदा : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

धाराशिव : जागजी येथील एन.व्ही. पी. शुगर प्रा. लि. या कारखान्याकडे गळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे बील दर १६ व्या दिवशी बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. ऊस तोडणी ठेकेदार व मजूर, कर्मचाऱ्यांचे पेमेंट देखील नियमितपणे बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ही माहिती दिली. एनव्हीपी शुगर कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख १ टन शेतकऱ्यांच्या उसाचे यशस्वी गाळप करण्याचे काम झाले आहे. त्यापासून ३० किलो वजनाच्या ४ लाख ९१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन खा. राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने २८ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केले असून आजपर्यंत १ लाख २ टन उसाचे गाळप या कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. उसास २ हजार ८०० रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी देखील या कारखान्यास ऊस देऊन चांगले सहकार्य केले आहे. तसेच २५ मार्चपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. यावेळी आप्पासाहेब पाटील, सी. ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चिफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, मे. चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इन्चार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here