बिजनौर : द्वारकेश येथील बुंदकी साखर कारखान्याने १३ डिसेंबर २०२१ पर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटीचे पैसे संबंधीत ऊस समित्यांकडे पाठविण्यात आले आहेत. कारखान्याचे मुख्य महाप्रबंधक (ऊस प्रशासन) रमेश परशुरामपुरीया यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे घ्यावेत असे आवाहन केले आहे.
आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यात अग्रेसर असलेल्या द्वारकेश येथील बुंदकी साखर कारखान्याने सात डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत खरेदी केलेल्या ऊसापोटी सरकारने जाहीर केल्यानुसार दर दिला आहे. हे पैसे नगीना, नजीबाबाद आणि बिजनौर येथील ऊस समित्यांना दिले आहेत. कारखान्याच्या ऊस विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक रमेश परशुरामपुरिया यांनी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे समित्यांकडून घ्यावेत असे सांगितले आहे. कारखान्याला स्वच्छ ऊसाचा पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.