त्रिवेणी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिले अदा

रामपूर : नारायणपूर येथील त्रिवेणी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ७७.२३ लाख क्विंटल ऊस खरेदी केला होता. कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १६८३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये एकूण उसाचे २४,७९० लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली.

कारखान्याचे सरव्यवस्थापक भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, गळीत हंगामातील सर्व ऊस बिले देण्याबाबत त्रिवेणी साखर कारखान्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. शेतकऱ्यांनी आगामी गळीत हंगामाच्या दृष्टीने तयारी करावी. आपल्या उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी पिकावरील किड नियंत्रणासाठीचे उपाय करावेत. ऊस पीक पडण्यापासून वाचवण्यासाठी तो बांधून घ्यावा. सरव्यवस्थापक भूपेंद्र सिंह यांनी यावेळी ऊस पिकाबाबत सविस्तर माहिती दिली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here