एसव्ही सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची २१ कोटी रुपयांची थकबाकी माफ करणार : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

रेनिगुंटा येथील एसव्ही सहकारी साखर कारखान्याच्या (SV Cooperative Sugar Factory) कर्मचार्‍यांना मागील टीडीपी सरकारकडून प्रलंबित असलेल्या २१ कोटी रुपयांची थकबाकी मंजूर केली जाईल, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी घोषणा केली आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, पॉलिटेक्निक आणि आयटीआय यांसारख्या क्षेत्रात शिकणाऱ्या ९,३२,२३५ विद्यार्थ्यांना ‘जगन्ना विद्या दिवेना’ योजनेअंतर्गत ६८० कोटी रुपयांचे वितरण करताना ते बोलत होते.

चित्तूर शहरात सोमवारी एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, शिक्षणामुळे समाजातील गरिबी आणि इतर वाईट गोष्टी दूर होतील, यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे सरकार शैक्षणिक सुधारणांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here