नविन हंगामाची सुरुवात परंतु पहिले बिल मिळणे बाकी

कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी नविन हंगामसाठी रोलर पुजन सुरु केले आहे. साखरेचा भाव देखील चांगलाच वधारला आहे. परंतु जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांची एफआरपी अजूनही थकीतच आहे. काही साखर कारखान्यांनी पहिले बिलदेखील दिलेले नाहि त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमिवर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

जुलैचा पहिला आठवडा संपला तरी बिले अद्यापही जमा झालेली नाहीत. साखर दरातील तेजीमुळे साखर कारखान्यांकडून थकलेली एफआरपी किमान जूनअखेर तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षीत होते. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना यंदाच्या हंगामाची तयारीदेखील करण्यात आली असून श्री दत्त इंडिया, विश्‍वास साखर कारखाना, मोहनराव शिंदे आदी कारखान्यांचे रोलर पुजन झाले आहे. क्रांती, सोनहिरासह काही साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी प्रमाणे होणारी रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही एफआरपी रक्कमा जमा केल्या आहेत. जिल्ह्यात दोन-तीन कारखान्यांचा अपवाद सोडला तर एफआरपीची रक्कमा मिळालेल्या नाहीत. काही कारखान्यांनी शेवटच्या दीड महिन्यात गाळलेल्या उसाचे पहिले बिलही दिले नाही.

ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी ऊस गाळपानंतर 14 दिवसात एफआरपी देणे बंधनकारक आहे. यामध्ये कारखाने असमर्थत ठरल्यास जिल्हा प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे एफआरपी थकल्यास त्या रक्कमेचे व्याजही देणे बंधनकारक आहे. मात्र या तरतुदीकडे सर्वच कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे.

तसेच सांगली जिल्ह्यातील दहा कारखान्यांकडेदेखील शेतकऱ्यांचे 162 कोटी थकीत आहेत. जिल्ह्यातील हुतात्मा, साखराळे, कारंदवाडी, वाटेगाव, सद्गगुरु, विश्‍वास, केनऍग्रो, उदगिर, महांकाली, माणगंगा साखर कारखान्यांकडे 162 कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here