हयात प्रमाणपत्राबाबत पेन्शनधारकांना दिलासा 

मुंबई : सरकारी पेन्शन मिळत असलेल्यांना हयात असल्याचे प्रमाणपत्र जमा करण्यासाठी दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँका किंवा पोस्ट कार्यालयांकडे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी अनेक वृद्ध पेन्शनधारकांना बँका आणि पोस्ट कार्यालयाकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी पेन्शनधारकांना बँका किंवा पोस्ट कार्यालयाकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यासाठी सरकारकडून ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी (डीएलसी) यूनिक प्रमाण आयडी तयार करावी लागणार आहे. आधार क्रमांकाच्या माध्यमातून हा आयडी तयार केला जाऊ शकतो. ही सुविधा आधार सेवा केंद्र किंवा पेन्शन देणाऱ्या एजन्सीच्या शाखेवर उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) क्रमांक आणि पेन्शन खात्यासह फिंगरपिंट द्यावा लागणार आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांकाद्वारे आयडी तयार होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here