लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याच्या चेअरमनपदी विरेंद्र सोळंके

माजलगाव : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विरेंद्र सोळंके तर व्हाईस चेअरमनपदी जयसिंग सोळंके यांची निवड झाली. आमदार प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके यांचा शेतकरी हिताचा वारसा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे मत नवनियुक्त चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी व्यक्त केले.

तेलगाव (ता. धारूर) येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी २२ मे २०२३ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here