लंडन : पेप्सिको युके आणि आयर्लंडने क्लासिक पेय पेप्सीमध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये आता ५७ टक्के कमी साखर असेल. पेप्सिकोने यास दुजोरा दिला आहे. आता त्यांच्या क्लासिक पेप्सी रेंजमध्ये प्रती १०० मिलिमीटर ४.५५ ग्रॅम साखर असेल, पूर्वी हे प्रमाण १० ग्रॅम होते. पेप्सिकोने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, साखरेचे प्रमाण कमी करण्यासह “रिफॉर्म्युलेटेड” पेप्सीला ऐसल्फेम पोटॅशियम आणि शुक्रालोजच्या मिश्रणाने गोड बनवले जाते. यामध्ये अतिरिक्त शर्करेपासून ५६ टक्के कमी कॅलरी असते.
कंपनीने पुढे सांगितले की, नव्या पद्धतीने युके आणि आयर्लंडमध्ये सर्व डबाबंद आणि बाटलीबंद क्लासिक पेप्सची जागा घेतली जाईल. या उत्पादनांमध्ये कमी साखर असल्याची माहिती देणाऱ्या पॅकेजिंगवर अद्ययावत पोषणाबाबत माहिती असेल. कंपनीने सांगितले की, लोकांसाठी सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी पेप्सिकोची परिवर्तन योजना पेप+ चा हिस्सा आहे. कंपनीने दावा केला की, आज ब्रिटन, आयर्लंडमध्ये विक्री केली जाणारी ९० टक्के हून अधिक कोला साखर मुक्त आहे. कंपनीने असेही सांगितले की, डाएट पेप्सी आणि पेप्सी मॅक्सच्या फॉर्म्युलात बदल करण्यात आला आहे. भारतीय बाजारावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. येथे सध्याच्या उत्पादनांची विक्री सुरू राहिल.