पेप्सिको उत्तर प्रदेशात करणार ५०० कोटींची गुंतवणूक

लखनऊ : उत्तर प्रदेशात पेप्सिको इंडिया ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. अन्न उत्पादन उद्योगासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. लखनौमधील दुसऱ्या पायाभरणी समारंभात पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ अहमद अल शेख यांनी ही माहिती दिली. कंपनी येत्या काही दिवसांत कृषी उत्पन्नावर आधारीत प्रकल्प उभारणार असल्याची माहिती शेख यांनी दिली.

शेख म्हणाले, ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही बियाणे, तंत्रज्ञान, औजारी, हवामान विमा तसेच आमच्या कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणार आहे.’ नव्या प्रकल्पाबाबत शेख म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात आम्ही तिसरा अन्न उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहोत. त्यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. यातून दीड हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. त्याचबरोबर कंपनीच्या पुरवठा साखळीचा ही विस्तार करण्यात येणार आहे. आम्हाला यासाठी ७ लाख टन बटाटे लागणार आहेत.’ शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या योजनेमुळे आमचा उत्साह वाढला आहे, असे शेख यांनी सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here