पेप्सिको २०२५ पर्यंत शितपेयांमधील साखरेत २५ टक्के कपात करणार

न्यूयॉर्क : युरोपीय संघात सोडा आणि आइस्ड चहामध्ये साखरेचे प्रमाण २५ टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती पेप्सिको कंपनीने दिली. कंपनीच्यावतीने २०२५ पर्यंत पौष्टिक स्नॅक्स लाँच करण्यात येणार आहे. कमी कॅलरीच्या स्वीटनरचा करून उत्पादने तयार करणे, पॉपकॉर्न लाइन पॉपवर्क्ससारख्या हेल्दी स्नॅक्स लाँच करण्यासह लेज ओव्हन बेक्ड रेंजसह कमी फॅटच्या नव्या ब्रँडचे पदार्थ बाजारात आणले जाणार आहेत. पेप्सिकोवर आपल्या शितपेयांमधील साखरेचे अतिरिक्त प्रमाण घटविण्यासाठी युरोपिय संघाकडून दबाव आहे. युरोपमधील अनेक देशांनी आरोग्यासंबंधी आणि जाडीच्या प्रश्नातून सुटका करण्यासाठी गोड सोडा, फळांचा रस आणि चविष्ट पाण्यावर टॅक्स लावला आहे.

पेप्सिको युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिल्वियू पोपोविसी यांनी सांगितले की, युरोपात आम्ही ज्या तीन पेयांची विक्री करतो, त्यापैकी एक पेय साखरमुक्त आहे. गेल्यावर्षी पेप्सिकोच्या एकूण विक्रीत युरोपचा हिस्सा पाचवा आहे. उत्तर अमेरिकेनंतर सर्वात जास्त महसूल निर्माण करुन देणारे हे क्षेत्र आहे. कंपनीने २०२५ पर्यंत अतिरिक्त साखरेच्या स्तर २५ टक्के आणि २०३० पर्यंत पेप्सी कोला, लिफ्टन आइस टी आणि सेव्हन अपसारख्या पदार्थांतून ५० टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here