श्रीलंकेकडून पुन्हा साखर आयातीस परवानगी

270

कोलंबो : गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेमध्ये गतीने घटलेल्या परकीय चलनामुळे गंभीर खाद्य संकट निर्माण झाल्याचे वृत्त होते. खाद्यपदार्थांच्या कृत्रीम टंचाईला तोंड देण्यासाठी सरकारने साठेबाजांविरोधात कारवाई सुरू केली. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, साखर, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या साठेबाजीला तोंड देण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आता सरकारने महागाईविरोधात लढण्यासाठी साखर आयातीला परवानगी दिली आहे.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, आवश्यक सेवांसाठी नियुक्त आयुक्त मेजर जनरल सेनारथ निवुन्हेला यांनी सांगितले की, साखर आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारने काही महिन्यापूर्वी साखर आयातीची परवानगी रद्द केली होती. आणि साखरेच्या नियंत्रणासाठी दरही निश्चित केले होते. आवश्यक सेवांचे आयुक्त निवुन्हेला यांनी सांगितले की, अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आगामी काळात साखर आयात करण्याबाबत पावले उचलण्यास सांगितले आहे. यादरम्यान सहकार आणि ग्राहक विषयांचे राज्यमंत्री लसंथा अलगियावन्ना यांनी सांगितले की,देशात साखरेचा सध्याचा साठा साधारणतः अडीच महिन्यांसाठी पुरेसा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here