पेट्रोल, डिझेलच्या किमती भडकल्या, १० रुपयांनी महागले इंधन

नवे इंधन दर जारी करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात बुधवारी पु्न्हा ८० पैसे प्रती लिटरची वाढ झाली. या वाढीनंतर १६ दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात १० रुपये प्रती लिटर वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील परभणी येथे १२३.४७ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर डिझेल १०६.०४ रुपयांना उपलब्ध आहे. बुधवारी मेट्रो शहरात मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महागले आहे. तर हैदराबादमध्ये डिझेल १०५.४९ रुपये प्रती लिटर झाले आहे. देशात आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे डिझेल सर्वाधिक महाग म्हणजे १०७.११ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये पेट्रोल सर्वात महाग म्हणजे १२२.९३ रुपये प्रती लिटर आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०४.६१ रुपये प्रती लिटरवरुन १०५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९५.८७ रुपये प्रती लिटरवरुन वाढून ९६.६७ रुपये प्रती लिटर झाले आहे. मुंबई, ठाण्यात पेट्रोल १२० रुपयांवर गेले आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये आहे तर डिझेल १०४.७७ रुपये झाले आहे. तर ठाण्यामध्ये पेट्रोल १२०.६५ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये आहे. यापूर्वी तीन नोव्हेंबर रोजी पेट्रोल ११५.८५ रुपये होते तर डिझेल १०६.६२ रुपये होते. गेल्या सोळा दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी १० रुपयांची वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here