पेट्रोल, डिझेलचे दर आजही जैसे थे

42

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी सोमवारी, पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे ठेवले आहेत. इंडियन अॉइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.९० रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेलची विक्री प्रती लिटर ८८.६२ रुपये दराने सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. चालू महिन्यात १ आणि ५ सप्टेंबर रोजी दोनवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५-१५ पैशांची कपात करण्यात आली आहे. एकूण ३० पैशांची कपात करण्यात आली असली तरी देशात इंधन दर उच्चांकी पातळीवर आहेत.

शुक्रवारी लखनौ येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही घटकांना जीएसटीच्या कक्षेत आणले जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नसल्याने सांगितले. भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्च स्तरावर आहेत.

दरम्यान इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज पेट्रोल १०७.२६ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.१९ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. कोलकाता, पाटणा, भोपाळ, बेंगळुरू आदी प्रमुख शहरांमध्ये इंधन दर शंभर रुपयांवरच आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दरात बदल केले जातात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here