पेट्रोल-डिझेल : सर्वात स्वस्त डिझेल ७७.१३ तर पेट्रोल ८२.९६ रुपये प्रती लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. सलग ५५ व्या दिवशी देशभरात इंधन दरात बदल करण्यात आलेले नाहीत. आज, बुधवारी सकाळी सहा वाजता इंडियन ऑईलद्वारे जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार देशात सर्वात स्वस्त डिझेल आणि पेट्रोल पोर्ट ब्लेअर येथे तर सर्वात महागडे इंधन राजस्थानातील श्रीगंगानगर येथे आहे. तर महानगरात मुंबईत पेट्रोल सर्वात महाग १०९.९८ रुपये लिटर आणि डिझेल ९५.४१ रुपये प्रती लिटर आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल १०७.२३ रुपये तर डिझेल ९०.८७ रुपये प्रती लिटर आहे. जयपूर १०७.०६ रुपये आणि डिझेल ९०.७० रुपये प्रती लिटर आहे. पाटणा येथे पेट्रोल १०५.९० रुपये तर डिझेल ९१.०९ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ तर बेंगळुरू येथे पेट्रोल १००.५८ रुपये आणि डिझेल ८५.०१ रुपये प्रती लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

वस्तुतः परदेशी चलनासोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरांच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केले जातात. ऑईल कंपन्या दराचा आढावा घेऊन दररोज दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलचे दर ठरवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here