दोन दिवसानंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ

19

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ३५ पैशांनी वाढून १०४.७९ रुपये प्रती लिटर झाली तर डिझेल दरातही तेवढीच वाढ करण्यात आली असून हा दर आता ९३.५२ रुपये झाला आहे.

मुंबईत पेट्रोल ३४ पैशांनी वाढून ११०.७५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ३७ पैशांनी वाढून १०१.४ पैसे प्रती लिटर झाले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे ११३.३७ रुपये आणि १०२.६६ रुपये, पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये अनुक्रमे १०५.४३ रुपये आणि ९६.६३ रुपये प्रती लिटरवर पोहोचला आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.१० रुपये तर डिझेल ९७.६३ रुपये झाले आहे.

तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात इंधन दरवाढीला सुरूवात केली. १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी सात दिवसांच्या वाढीनंतर दोन दिवस दर स्थिर राहिले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here