नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांचा पेट्रोल, डिझेल दरावाढीचा सिलसिला सुरुच राहिला आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. तर डिझेलचे दर वधारला आहे. पेट्रोलच्या दरात ३१ ते ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात १५ ते २१ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत इंडियन ऑईलच्या पंपावर पेट्रोल १०१.५४ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर दराने विक्री सुरू आहे.
देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, भोपाळ, जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल केले जातात. सकाळी हे नवे दर लागू होतात. पेट्रोल, डिझेलवर एक्साईज कर, डिलर कमिशन आणि इतर करांची आकारणी केल्यानंतर या इंधनाचे दर जवळपास दुप्पट होतात. नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून आपल्या शहरातील दरांची माहिती मिळवू शकतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link