पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ, दिल्लीत पेट्रोल १०८ तर मुंबईत डिझेल १०५ रुपयांवर

नवी दिल्ली : भारतात इंधन दरवाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल उच्चांकी स्तरावर पोहोचल्याने देशभरात तेलाच्या दरावर महागाईची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी या आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत पेट्रोल, डिझेल दरात वाढ केली नाही. मात्र, काल बुधवारपासून आज सलग दुसऱ्या दिवशी, २८ ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५-३५ पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलचे नवे दर १०८.२९ रुपये प्रती लिटर तर डिझेलचे दर ९७.०२ रुपये प्रती लिटवर पोहोचले. तर मुंबईत पेट्रोल ११४.१४ रुपये आणि डिझेल १०५.१२ रुपये प्रती लिटरवर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here