दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेल दरात वाढ, दिल्लीत पेट्रोल १०६ रुपयांवर

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी दोन दिवसांच्या अंतराने आज, बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज डिझेलच्या दरात ३४ ते ३७ पैसे आणि पेट्रोलच्या दरात ३० ते ३४ पैशांची वाढ करण्यात आली. अनेक राज्यांत इंधन दर १०० रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. देशात दररोज वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागली आहे.

नव्या दरवाढीनंतर दिल्लीत आता पेट्रोल १०६.१९ रुपये तर डिझेल ९४.९२ रुपये प्रती लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ११२.११ रुपये आणि डिझेलचा दर १०२.८९ रुपये प्रती लिटरवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.७७ रुपये तर डिझेल ९८.०३ रुपये प्रती लिटर दराने विक्री करण्यात येत आहे. चेन्नईत पेट्रोल १०३.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९९.२६ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. जिल्ह्यात पेट्रोल दराचा उच्चांक निर्माण झाला आहे. बालाघाटमध्ये पेट्रोल ११७.१७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १०६.३४ रुपये प्रती लिटर झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तर त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. भाजीपाल्यासह सर्व वस्तूंच्या दरात वाढ होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here