पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज नवा उच्चांक, महागाईचा झटका

नवी दिल्ली : पुन्हा एकदा देशातील नागरिकांना झटका देत सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीसह सर्व महानगरांतही हे दर उच्चांकी स्तरावर पोहोचले. आयओसीएलच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल ३० पैशांनी महागले आहे. नव्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०२.६४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९१.०७ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. सोमवारी इंधन कंपन्यांनी दरात वाढ केली नव्हती.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती. ब्रेंट क्रूड ०.१३ टक्क्यांनी घटून ७९.३८ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०८.६७ रुपये तर डिझेल ९८.८० रुपये प्रती लिटरने मिळत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०३.३६ रुपये तर डिझेल ९४.१७ रुपये प्रती लिटरवर आले आहे. चेन्नईत पेट्रोलची १००.२३ रुपये आणि डिझेलची ९५.५९ रुपये या दराने विक्री केली जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज सकाळी सहा वाजता बदल केले जातात. सहा वाजता नवे दर लागू होतात. या दोन्ही प्रकारच्या इंधनामध्ये एक्साईज कर, डिलर कमीशन, इतर बाबींचा समाविष्ट झाल्यावर हा दर जवळपास दुप्पट होतो. त्या आधारावर दर निश्चिती केी जाते. आपणही एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर जाणून घेऊ शकतो. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP लिहून आपल्या शहराच्या कोडसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here