चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन यांच्या युद्धादरम्यान भारतात आता पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ सुरू आहे. गेल्या चार दिवसांत इंधन दरवाढीने जनतेवर महागाईला भार पडला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैसे प्रती लिटरची वाढ करण्यात आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आज, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ८० पैसे वाढीनंतर पेट्रोलचा दर ९७.८१ रुपये झाला आहे. तर डिझेल ८९.०७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नव्हते. गेल्या आठवड्यात मंगळवारपासून इंधन दरवाढीला सुरूवात झाली आहे.

याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पहिले दोन दिवस दरवाढ केल्यानंतर तिसऱ्या दिवशी दरवाढ करण्यात आली नव्हती. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार देशाची आर्थिक राजधानीमुंबईत पेट्रोलचा दर ११२.५१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.७० रुपये प्रती लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११२.५१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.७० रुपये प्रती लिटरने मिळत आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०३.६७ रुपये आणि डिझेल ९३.७१ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी केले आहे. बुधवारी इंडियन ऑईलने कच्च्या तेलाचा मोठा साठा खरेदी केला. यासोबतत वेस्ट आफ्रिकन ऑईलचीही खरेदी केली. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आयओसीएल मे महिन्यासाठी ३० लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here