पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, १० दिवसांत ३ रुपयांची दरवाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले आहे.

या दोन्ही इंधनाच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल आता १०९ रुपये ६९ पैशांना मिळत आहे. गेल्या दहा दिवसात यामध्ये जवळपास ३ रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल ९८ रुपये ४२ पैशांवर पोहोचले आहे. चार महानगरांचा विचार केला तर मुंबईत पेट्रोल ११५ रुपये ५० पैसे आणि डिझेल १०६ रुपये ६२ पैसे प्रती लिटर दरापर्यंत पोहोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११० रुपये १५ पैसे आणि डिझेलची किंमत १०१ रुपये ५६ पैसे प्रती लिटर झाली आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०६ रुपये ३५ पैसे आणि डिझेल १०२ रुपये ५९ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. आगामी काळात हे दर दररोज वाढणार की यात घसरण होणार याविषयी साशंकता आहे.

पेट्रोल दरवाढीमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here