पेट्रोल-डिझेल दराचा आज पुन्हा भडका, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज, शुक्रवारी पुन्हा एकदा वाढ झाली. राजस्थान आणि मध्य प्रदेशाबरोबरच महाराष्ट्रातील अनेक शहरांत आधीच पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी जारी केलेल्या दर अधिसूचनेनुसार आज पेट्रोलच्या दरात २० पैसे प्रती लिटर आणि डिझेलच्या दरात ३६ पैसे प्रती लिटरची वाढ झाली.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान १८ दिवस दरवाढ केली नव्हती. त्यानंतर चार मे रोजी पुन्हा दरवाढीला सुरुवात झाली. आज झालेल्या दरवाढीनुसार पेट्रोल, डिझेल आता उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. दिल्लीत आता पेट्रोल ९२.३४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८२.९५ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.

असा वाढतो पेट्रोल-डिझेलचा दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर कर जोडल्यानंतर याचा दर जवळपास दुप्पट होतो. केंद्र सरकारची एक्साईज ड्यूटी आणि राज्य सरकारने व्हॅट हटविल्यास डिझेल, पेट्रोलच्या किमती निम्म्यापेक्षा कमी म्हणजे २७ रुपये लिटर होतील. मात्र, दोन्हीकडून कर कमी जाण्याची शक्यता नाही. कारण, महसूल मिळविण्याचा हा सर्वात मोठा मार्ग सध्या उपलब्ध आहे.

दररोज दरात होतो बदल
वस्तूतः परदेशी चलनासोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरांच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केले जातात. ऑईल कंपन्या दराचा आढावा घेऊन दररोज दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलचे दर ठरवतात.

एसएमएसद्वारे जाणून घ्या शहरातील दर
आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ तर एचपीसीएलचे ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here