पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर

34

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या बाजारात या महिन्याच्या सुरुवातीला इंधन दरात कपाती दिसून येत आहे. दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी, ३ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रती लिटर १५-१५ पैशांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर दर स्थित आहेत.
यासोबतच दिल्लीत आज पेट्रोल १०१.३४ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८८.७७ रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०७.३९ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.३३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ९९.०८ रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा दर ९३.३८ रुपये आहे. आंतररष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर आपल्याला एसएमएसवरही उपलब्ध होऊ शकतात. इंडियन ऑईलने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मोबालईलवरुन RSP असा संदेश आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. दररोज सकाळी सहा वाजता नवे दर जाहीर केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यानंतर हे दर जवळपास दुप्पट होतात. पेट्रोलियम कंपन्या दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार आपल्या दरात त्याची सुधारणा करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here