पेट्रोल, डिझेल दराचा पुन्हा भडका

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. आज, गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५-३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात इंधन दरात आतापर्यंत ५ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या उच्चांकी पातळीवर इंधन दर पोहोचले आहेत.

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज, २१ ऑक्टोबर रोजी पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ केली तर डिझेलच्या दरातही तेवढीच वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०६.५४ रुपये प्रती लिटर आणि मुंबईत पेट्रोल ११२.४४ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत डिझेलचा दर १०३.२६ रुपये असून दिल्लीत अद्याप डिझेल ९५.२७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल १०७.११ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९८.३८ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल १०३.६१ रुपये आणि डिझेल ९९.५९ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. ऑक्टोबर महिन्यात इंधन दरात उच्चांकी वाढ झाली आहे. आतापर्यंत इंधन दरात ५ रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ९० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचू शकतात. अशा स्थितीत पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी वाढ शक्य आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here