पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

124

नवी दिल्ली : मुंबईसह सर्व शहरांत सोमवारी पेट्रोलदरात प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली. तर, डिझेलचे दर स्थिर होते. यामुळे मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर 80.32 व 68.94 रुपये नोंदवले गेले. नवी दिल्लीत हेच दर अनुक्रमे 74.66 व 65.73 वर पोहोचले. पेट्रोलच्या प्रतिलिटर दराने पुन्हा एकदा 80 चा टप्पा पार केला आहे. देशभरातील सर्व महानगरांत व अन्य ठिकाणी इंधनदरांनी चालू वर्षातील सर्वोच्च दरांची नोंद केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेण्ट क्रूड ऑइलचे दर सोमवारी प्रतिबॅरल 62.44 अमेरिकी डॉलरवर पोहोचले. या कच्च्या इंधनाच्या दरात चालू महिन्यात आत्तापर्यंत तीन डॉलरने वाढ झाल्याने देशांतर्गत इंधनदर वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच गेल्या चार दिवसात पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 46 पैशांनी वाढ झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here