पेट्रोल, डिझेलच्या दरात तिसऱ्या दिवशी वाढ

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात ३५ पैसे अशी वाढ केली आहे.
त्यामुळे दिल्लीत पेट्रोल १०५.४९ रुपये तर डिझेल ९४.२२ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे.

मुंबईत पेट्रोल दरात ३४ पैशांची वाढ होवून पेट्रोल १११.४३ रुपये तर डिझेल ३७ पैशांनी वाढून १०२.१५ रुपये झाले आहे. पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०६.१० रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९७.३३ रुपये प्रती लिटर दराने विक्री होत आहे. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०२.७० आणि ९८.५९ रुपये प्रती लिटर झाला आहे.

इंधन कंपन्यांनी गेल्या आठवड्यात दरवाढीस सुरुवात केली. १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी दर स्थिर राहिले होते. आज दोन दिवसांच्या विरामानंतर दरात वाढ करण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here