सलग २५ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी (ओएमसी) बुधवारी इंधनाच्या दरात कोणतेही फेरबदल केले नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल न होण्याचा हा सलग २५ वा दिवस आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.८४ रुपये प्रती लिटर तर डिझेलची ८९.८७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे. १८ जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.
मुंबईत पेट्रोलचा दर २९ मे रोजी १०० रुपयांवर पोहोचला होता. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर १०७.८३ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९७.४५ रुपये प्रती लिटर आहे. सर्व महानगरांच्या तुलनेत हे दर अधिक आहेत. इतर महानगरांमध्येही आधीच पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत.

एप्रिल २०२० नंतर दिल्लीत पेट्रोल ६९.५९ रुपये प्रती लिटरवरून ३२.२५ रुपये प्रती लिटरने वाढून १०१.८४ रुपये लिटर झाले आहे. अशाच पद्धतीने राजधानीत डिजेलमध्ये २७.५८ रुपये प्रती लिटर वाढून ८९.८७ रुपये झाले आहे. एप्रिल २०२० मध्ये डिझेलचा दर ६२.२९ रुपये लिटर होता.

दरम्यान, देशाच्या निर्यातीमध्ये जुलै महिन्यात ४७.१९ टक्क्यांची वाढ होऊन ३५.१७ अब्ज डॉलर झाली आहे. पेट्रोलियम, इंजिनीअरिंग, रत्ने, आभूषणे या क्षेत्रातील निर्यातीची कामगिरी उल्लेखनिय आहे. जुलै महिन्यात आयातीमध्येही ५९.३८ टक्क्यांची वाढ झाली असून आयात ४६.४० अब्ज डॉलर झाली. त्यामूळे व्यापरातील तूट ११.२३ अब्ज डॉलरची आहे. पेट्रोलियम निर्यात वाढून ३.८२ अब्ज डॉलर झाली आहे. तर इंजिनीअरिंग निर्यात २.८२ अब्ज डॉलर आणि रत्न, आभूषणांची निर्यात १.९५ अब्ज डॉलर झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये पेट्रोलियम, कच्चे तेल, उत्पादनांची आयात ९७ टक्क्यांनी वाढून ६.३५ अब्ज डॉलरवर पोहोचली. सोन्याची आयात १३५.५ टक्क्यांनी वाढून २.४२ अब्ज डॉलरवर गेली आहे.

परकीय चलनाच्या दरांसोबत आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलले जातात. ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या कंपन्या दररोज विविध शहरातील दरांची माहिती अपडेट करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here