सलग ४९ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

जयपूर : सरकारी इंधन कंपन्यांनी सलग ४९ व्या दिवशीही देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

जयपूरमध्ये गुरुवारी पेट्रोलचा दर १०७.०६ रुपये आणि डिझेल ९०.७० रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.
राजस्थान सरकारने १७ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल ४.०४ रुपये आणि डिझेल ५.०१ रुपये प्रती लिटर स्वस्त झाले होते. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट ३६ ऐवजी ३१.०४ टक्के आणि डिझेल २६ वरुन १९.३० टक्के केला आहे.

केंद्र सरकारने पेट्रलो आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ आणि १० रुपये प्रती लिटर कमी करुन देशातील इंधन दरात कपात केली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटकसह देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी या दोन्हीवरील व्हॅट कमी केले. देशांतर्गत बाजारपेठेत ४३ व्या दिवशीही इंधन दर स्थिर आहेत.

दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर तर मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर तर चेन्नईत १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटरवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला जातो. पेट्रोलियम कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज दरात बदल करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज सकाळी सहा वाजता दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here