आजपासून पेट्रोल-डिझेल चे  रेशनिंग: जिल्हाधिकारी दौलत देसाई

135

कोल्हापूर, ता.26 : पेट्रोल-डिझेल याचा पुरेसा साठा आहे. मात्र, अनावश्यक पेट्रोल भरुन रस्त्यावर होणारी केवळ गर्दी टाळण्यासाठी आजपासून (26 मार्च) पेट्रोल पंपांवर रेशनिंग करण्यात येत आहे. शासकीय तसेच अत्यावश्यक व शिक्षण विषयी पासेस व स्टिकर दिलेले आहेत, त्यांना पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तरीही काही ठिकाणी अनावश्यक दुचाकी, चारचाकी वाहने घेवून नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. याचा विपरित परिणाम इतरांवर होणार आहे. हे लक्षात घेवून उद्यापासून पंपांवर पेट्रोल डिझेलचे रेशनिंग करण्यात येणार आहे. खासगी वाहने, व्यक्ती यांच्याकडे परवाना, ओळखपत्र असल्याशिवाय त्यांना इंधन पुरविले जाणार नाही. हे इंधन शासकीय तसेच अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवले जाईल. याचा अर्थ इंधन कमी आहे असा नसून, पूर्ण पुरेसा साठा असून, फक्त रस्त्यावरील गर्दी टाळणे हा उद्देश आहे.  नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here