दिल्लीत पेट्रोल १०० रुपयांजवळ

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या ताज्या इंधन दरवाढीनंतर सोमवारी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९९.८६ रुपये आणि डिझेल ८९.३६ रुपये प्रती लिटरवर पोहोचले.

या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोल १०५.९२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.९१ रुपये या दराने मिळत आहे. तर कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९९.९४ आणि ९२.२७ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशभरात तफावत आढळते. राज्य सरकारांकडून यावर लागू केल्या जाणाऱ्या व्हॅटमुळे इंधन दर वेगवेगळे आहेत. देशातील अनेक राज्यांत सध्या पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here