पाकिस्तानात पेट्रोल २९० रुपये लिटर, अर्ध्या रात्रीत वाढले १८ रुपये

आर्थिक संकटग्रस्त पाकिस्तानच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. शाहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सोमवारी देशात काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्याच निर्णयामुळे देशातील जनतेवर महागाईचा बोजा वाढला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक वाढीची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. एका रात्रीत १८ रुपये दरवाढ करण्यात आली आहे.

डॉन वृत्तपत्रामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने मंगळवारी मध्यरात्री पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवल्या. आता पेट्रोलचा दर १७.५०.50 रुपयांनी वाढून २९०.४५ रुपये लिटर झाला आहे. हायस्पीड डिझेलच्या दरात २० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्याची किंमत २९३.४० रुपये लीटर झाली आहे, असे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे. या दरवाढीबाबत पाकिस्तानच्या वित्त विभागाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. इंधनाच्या नवीन किमती बुधवार, १६ ऑगस्टपासून लागू करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आधीच महागाईचा चटका सोसणाऱ्या जनतेवर आणखी एक बोजा वाढला आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियमच्या किमती वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत फेरबदल करण्यात येत आहेत. एक ऑगस्ट रोजी तत्कालीन शहबाज शरीफ सरकारने पेट्रोलच्या सध्याच्या किमतीत १९.९५ रुपये आणि डिझेलच्या दरात १९.९० रुपये लिटरने वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. वघ्या 15 दिवसांत तेलाच्या किमती सुमारे ४० रुपयांनी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here