जगातील या १० शहरांत पेट्रोल सर्वाधिक महाग

भारतात पेट्रोलचा दर अपेक्षेपेक्षा अधिक असला तरी सर्वाधिक महागड्या दराने पेट्रोलची विक्री करणाऱ्या अव्वल क्रमांकावर दहा शहरांमध्ये भारताचा समावेश नाही. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशिक करण्यात आलेल्या एका अहवालात जगातील दहा शहरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तेथे सर्वात महागड्या दराने पेट्रोल आहे. या यादीत हाँगकाँग पहिल्या क्रमांकावर आहे.

हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर अडीच डॉलर (१८८.१० रुपये) आहे. हाँगकाँगमध्ये २०११ मध्ये पेट्रोलचा दर २.१३ डॉलर होता. तो २०१६ मध्ये घटून १.७३ डॉलरवर आला. मात्र, २०२० मध्ये पुन्हा दर वाढून २.१९ डॉलरवर आला. आता हा दर २.५० डॉलर झाला आहे. अॅमस्टरडॅम हे नेदरलँडमधील शहर द्वितीय क्रमांकावर आहे. येथे पेट्रोलचा दर २.१८ डॉलर म्हणजे १६४ रुपये आहे. तर नॉर्वेच्या ओस्लो शहरात पेट्रोल १५५ रुपये (२.०६ डॉलर) प्रती लिटर आहे. तेल अविवमध्ये पेट्रोलचा दर दोन डॉलर म्हणजे १५०.४८ रुपये आहे. जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये पेट्रोल १.९९ डॉलरला मिळते. तर ईआययूच्या रिपोर्टनुसार ग्रीसमधील अथेन्स शहर ६ व्या क्रमांकावर आहे. तेथे पेट्रोल १.९८ डॉलर म्हणजेच १४९ रुपयांना मिळते. इटलीतील रोममध्ये पेट्रोल १.९८ डॉलर म्हणजे १४९ रुपयांना आहे. हे शहर सातव्या क्रमांकावर आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम आठव्या, आइसलँडचे रेकजाविक शहर नवव्या आणि फिनलँड दहाव्या क्रमांकावर आहे. यादीत भारताचा क्रमांक ५६ वा आहे. मात्र, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, चीन, बांगलादेश या देशांमध्ये भारतापेक्षा अधिक स्वस्त पेट्रोल मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here