पेट्रोलची पुन्हा दरवाढ, डिझेलच्या दरात कपात

नवी दिली : देशात इंधन दरात वाढीमुळे महागाई उच्चांकावर पोहोचली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ केली. त्यामुळे पेट्रोल विक्रमी दरावर पोहोचले आहे. तर डिझेल दरात गेल्या तीन महिन्यात कपात करण्यात आली आहे.

तेल कंपन्यानी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, बारा जुलै रोजी पेट्रोलच्या दरात २८ पैशांची वाढ केली. तर डिझेलमध्ये १६ पैशांनी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी डिझेलच्या दरात १४ पैशांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत आता पेट्रोल १०१.१९ पैशांवर पोहोचले असून डिझेल घटून ८९.७२ रुपये झाले आहे.

देशभरातील तेल कंपन्यांनी रविवारी, ११ जुलै रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केला नव्हता. त्यामुळे डिझेल, पेट्रोलचे दर स्थिर राहिले होते. राजधानी दिल्लीत १० जुलै रोजी पेट्रोलच्या दरात ३५ पैसे तर डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली होती. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरात दररोज सकाळी वाढ केली जाते. हे दर आपल्याला एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here