पेट्रोल दरवाढीचा धडाका सुरूच; दिल्लीत पेट्रोल १०३ रुपयांवर

32

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीचा धडाका सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली. सरकारी तेल कंपन्या, इंडियन अॉइल,एचपीसीएल आणि बीपीसीएलने पेट्रोल दरात ३० पैसे आणि डिझेलच्या दरात ३४ पैशांची वाढ केली. त्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०३.२४ रुपये प्रती लिटर झाले आहे. तर डिझेल ९१.७७ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य जनतेला महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीपाठोपाठ कोलकातामध्ये आता पेट्रोल १०३.९४ रुपये आणि डिझेल ९४.८८ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०९.२५ रुपये आणि डिझेल ९९.५५ रुपये प्रती लिटर अशा उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. तर चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.२६ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दक्ष मंगळवारी तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचले आहेत. तर यूएस बेंचमार्क क्रूड २०१४ च्या उच्चांकी पातळीवर आले आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या ओपेक देशांनी क्रूडचे उत्पादन वाढविण्याएऐवजी कालबद्ध पद्धतीने ते वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here