पेट्रोलची आज पुन्हा दरवाढ, मुंबईत डिझेल ९३ रुपयांवर

नवी दिल्ली : देशतील चार बड्या महानगरांमध्ये आज पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल ३० पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल १०१ रुपये आणि डिझेल ९३ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोल २६ पैशांनी महाग होऊन १००.९८ रुपये आणि डिझेल ३० पैशांनी वाढून ९२.९९ रुपये प्रती लिटरवर पोहोचले.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत २७ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी महागले. येथे एक लिटर पेट्रोल ९४.७६ रुपये आणि डिझेल ८५.६६ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. ४ मेपासून आतापर्यंत १८ दिवसांत पेट्रोल – डिझेलची दरवाढ सुरू आहे. मात्र, उर्वरीत १४ दिवसांत दरात बदल केले गेले नाहीत. या दरम्यान दिल्लीत पेट्रोल ४.३६ रुपये महागले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल २६ पैशांनी महाग होऊन ९४.७६ रुपये आणि डिझेल २८ पैंनी वाढून ८८.५१ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. चेन्नईत पेट्रोलचा दर २४ पैशांनी आणि डिझेल २६ पैशांनी वाढला. तेथे एक लिटर पेट्रोल ९६.२३ रुपये आणि एक लिटर डिझेल ९०.३८ रुपयांना मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here