पुन्हा वाढले पेट्रोलचे दर, डिजेल दर पूर्वीप्रमाणेच

नवी दिल्ली : देशामध्ये पेट्रोल च्या दरामध्ये सलग दुसर्‍या दिवशी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरामध्ये 16 पैसे प्रति लिटर ची वाढ करण्यात आली. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 80.73 रुपये लिटर झाले आहे. तर डीजेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नसून, डिजेलचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील.

यापूर्वी रविवारी 47 दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. रविवारी दिल्लीमध्ये पेट्रोल 80.57 रुपये लिटर होते.

जर देशाच्या प्रमख महानगरांचा विचार करायचा झाल्यास दिल्लीमध्ये पेट्रोल 80.73 रुपये लीटर आणि डीजेल 73.56 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 87.45 रुपये लिटर आणि डीजेल 80.11 रुपये लिटर आहे. कलकत्त्यामध्ये पेट्रोल 82.30 रुपये आणि डिजेल 77.06 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 83.87 रुपये लिटर तर डीजेल 78.86 रुपये लिटर आहे. याप्रमाणे एनसीआर चा विचार करायचा झाल्यास नोएडा मध्ये पेट्रोल 81.34 रुपये लिटर आणि डिजेल 73.87 रुपये लिटर आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यां किंमतीच्या समीक्षेनंतर रोज पेट्रोल आणि डिजेलचे रेट निश्‍चित करत आहेत.

दरम्यान जूनच्या तुलनेत जुलैमध्ये ईंधनच्या वापरामध्ये मोठी घट नोंद झाली आहे. जुलै 2020 मध्ये इंधन वापरात घट होवून हा रेट 15.67 मिलियन टनापयंंत आला आहे. जुलै 2019 च्या तुलनेत 11.7 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षाच्या समान अवधीमध्ये 17.75 मिलियन टन इंधनाचा वापर झाला होता.

दिल्लीमध्ये डिजेल वर वॅट ला 30 टक्के कमी करुन 16.75 टक्के केले आहे. यामुळे दिल्लीमध्येही डिजेल स्वस्त झाले आहे. यापूर्वी देशात डिजेल सर्वात महाग होते आणि पेट्रोपेक्षाही याचा रेट अधिक होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here