देशात ७५ दिवसांत ११.४४ रुपायांनी महागले पेट्रोल

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी, इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल वितरण कंपन्यांनी (ओएमसी) जाहीर केलेल्या दरानुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेलची ८८.९२ रुपये प्रती लिटरने विक्री सुरू आहे.

किमतीत कपात झाल्यानंतर देशात शुक्रवारी पेट्रोल, डिझेलचे दर सलग दिसऱ्या दिवशीही स्थिर राहीले. शुक्रवारीही इंधन दरात बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. मात्र, आता हे दर ७१ डॉलर प्रती बॅरलवर आहेत. अमेरिकेकडील वाढती मागणी आणि इन्व्हेंट्रीचा स्तर घसरल्याने दर वाढण्याची गतीही वाढू शकते. चार मेपासून १७ जुलैपर्यंत म्हणजे ७५ दिवसांत पेट्रोलच्या दरात ११.४४ रुपये प्रती लिटर आणि डिझेलच्या दरात ९.१४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या अनेक भागात पेट्रोलची विक्री १०० रुपये प्रती लिटरने केली जात आहे. त्यानंतर दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. काही प्रमाणात दर कमी केले गेले आहेत.

भारताला आपल्या गरजेपोटी ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करावी लागते. तेल कंपन्यांकडून दररोज दरात बदल केले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर आपल्याला एसएमएसवरही उपलब्ध होऊ शकतो. इंडियन ऑईलने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मोबालईलवरुन RSP असा संदेश आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. दररोज सकाळी सहा वाजता नवे दर जाहीर केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यानंतर हे दर जवळपास दु्पट होतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here