पेट्रोल विक्री कोविड पूर्व स्थितीत, डिझेल विक्री ११ टक्क्यांनी कमी

नवी दिल्ली : देश आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर येत आहे. त्यामुळे बाजारात आता उलाढाल वाढल्याचे दिसत आहे. दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रातील प्रॉडक्शनने गती घेतली आहे. हळूहळू आर्थिक व्यवहार वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या खपातून याचा अंदाज येत आहे. गेल्या १७ महिन्यांत पहिल्यांदाच पेट्रोलचा खप कोविड पूर्व काळाच्या स्तरावर आला आहे. तर २०१९ च्या तुलनेत डिझेलची विक्री ११ टक्क्यांनी कमी आहे.

याशिवाय गेल्या वर्षाची तुलना केल्यास जुलै महिन्यात पेट्रोल १७ टक्के अधिक तर डिझेल १२ टक्के अधिक विक्रीच्या स्तरावर आहे. जूनच्या तुलनेत पेट्रोलचा खप ९ टक्क्यांनी अधिक आहे. तर डिझेलचा खप गेल्या महिन्याच्या तुलनेत १ टक्क्यांनी घसरला आहे. इंडियन ऑईलचे चेअरमन श्रीकांत माधव वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेलचा खप कोविड महामारीपूर्व काळापर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळी पर्यंतचा काळ लागेल. त्यापेक्षा अधिक कालावधी जेट फ्युएलसाठी आवश्यक आहे.

देशात हळूहळू विमान सेवा सुरू केल्या जात आहेत. त्याचा परिणाम जेट फ्यूएलवर दिसून येत आहे. २०१९च्या तुलनेत जेट फ्यूएलचा खप ५३ टक्क्यांनी वाढला आहे. जुलैच्या तुलनेत हा खप २१ टक्के अधिक तर गेल्या वर्षीच्या तुलनेत २९.५ टक्क्यांनी जास्त आहे. देशात एलपीजीचा खप जुनच्या तुलनेत ४ टक्के अधिक झाला तर जुलै २०१९च्या तुलनेत हा खप ७.५ टक्क्यांनी वाढला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here