पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील उतार-चढावादरम्यान बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात आज, २२ जून रोजी कोणताही बदल केलेला नाही. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह सर्व शहरात राष्ट्रीय स्तरावरील इंधन दर स्थिर ठेवले आहेत. भारतीय तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर आहे.

आजकतने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीलगत गुरुग्राममध्ये पेट्रोल ९७.१० रुपये तर नोएडात ९६.०२ रुपये प्रती लिटर आहे. तर उत्तर प्रदेशच्या लखनौत पेट्रोल ९६.५७ रुपये प्रती लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोल १११.३५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रती लिटर असा दर आहे. आपणही दररोज एसएमएस करून आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचा दर जाणून घेऊ शकतो. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. दरम्यान, आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात उतार-चढाव सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर ११३.३ डॉलर प्रती बॅरल होवनही भारतातील इंधन कंपन्यांनी दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here