फिलिपाईन्स : ३८,००० मेट्रिक टन आयात साखर ‘आरक्षित’ म्हणून वर्गीकृत

मनिला : शुगर नियामक प्रशासनाने (SRA) जवळपास ३८,००० मेट्रिक टन प्रक्रियाकृत साखर “C” या आरक्षित साखर गटात वर्गीकृत केली आहे, असे SRA बोर्डाचे सदस्य पॉल अजकोना यांनी सांगितले. अजकोना यांनी स्पष्ट केले की, आयात साखरेपैकी ३८,००० मेट्रिक टन साखर हा आयातीसाठी अधिकृत केलेल्या ४,४०,००० मेट्रिक टन साखरेचा हिस्सा आहे.

अजकोना यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारात आयात साखर वाढू नये याची पुरेपुर दक्षता घेतली जात आहे. देशात येणारी सर्व साखर आरक्षित साखरेच्या रुपात वर्गीकृत केली गेली आहे यावर त्यांनी भर दिला. आणि ही साखर तोपर्यंत बाजारात विक्री केली जाऊ शकत नाही, जोपर्यंत एसआरए बोर्ड याला बी अथवा देशांतर्गत साखरेच्या रुपात पुनर्वर्गीकृत करीत नाही. अजकोना यांनी पुढे सांगितले की, चालू गळीत हंगामात आमच्याकडे अद्यापही पुरेसा साखरेचा पुरवठा आहे. जवळपास ११,५०० मेट्रिक टन साखर जी ऑर्डर जारी करण्यापूर्वी आणण्यात आली होती, त्याच्या आयातीसही मंजुरी देण्यात आली आहे. अजकोना यांनी सांगितले की, या साखर आयातीची परवानगी कृषी विभागाचे वरिष्ठ अव्वर सचिव डोमिंगो पांगा निबन यांनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here