फिलिपाइन्स २.४-२.५ MMT उत्पादनासह साखर क्षेत्रात होवू शकतो आत्मनिर्भर

मनिला : फिलिपाइन्सला साखर उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी जवळपास २.४ ते २.५ मिलियन मेट्रिक टन (MMT) साखर उत्पादन करण्याची गरज आहे, असे शुगर नियमाक प्रशासनाचे (SRA) कार्यवाहक प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पाब्लो लुइस एस अजकोना यांनी सांगितले. ते म्हणाले की, खरेतर आम्हाला आत्मनिर्भर होण्यासाठी जवळपास २.४ ते २.५ मिलियन मेट्रिक टन साखर उत्पादन करण्याची गरज आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत केली पाहिजे, असा आमचा उद्देश आहे.

ते म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत आमच्या शेतांचा आकार (केवळ १-२ हेक्टर) छोटा आहे. त्यामुळेच आमच्या छोट्या शेतकऱ्यांना सहकारी समित्यांमध्ये समायोजित करण्याची गरज आहे. अशाच प्रकारे त्यांनाही सर्व मदत वितरीत केली जावू शकते. अजकोना यांनी सांगितले की, ९० टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टरदरम्यान ऊस शेती आहे. आणि आम्ही त्यांना ३० हेक्टर अथवा त्यापेक्षा अधिक आकाराच्या ब्लॉक शेतीमध्ये विभागण्याचा प्रयत्न करीत आहोत. या माध्यमातून आम्ही त्यांचे आधुनिकीकरण करू शकतो. आम्ही त्यांना तांत्रिक मदत पुरवू शकतो.

परिक्षणांचा हवाला देवून ते म्हणाले की, ब्लॉक शेतीपासून साखरेच्या उत्पादनात प्रती हेक्टर ५ ते १० टनांची सुधारणा झाली आहे. SRA उत्पादनात सुधारणेसाठी उसाचे उच्च उत्पादन करणाऱ्या वाणांना वितरीत करण्याची तयारी करत आहे. अजकोना यांनी सांगितले की, अनुमानीत साखर उत्पादन जवळपास १.७८ मिलियन मेट्रिक टन आहे आणि मागणी २.३ मिलियन मेट्रिक टनाची आहे. राष्ट्रपती फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी एसआरएच्या शिफारशीवर १,५०,००० मेट्रिक टन साखरेच्या अतिरिक्त आयातीस मंजुरी दिली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्सचे अध्यक्ष एनरिक डी. रोजस यांनी सांगितले की, अजकोना सहकारी समित्यांना मजबूत करण्याच्या दिशेने योग्य पावले उचलत आहेत. हा उद्योग २०१० मधील २.५ मिलियन मेट्रिक टनाचे उच्चांकी उत्पादनावर परत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here