फिलीपाईन्स : खतांच्या किमती वाढल्याने ऊस उत्पादकांमध्ये चिंता

मनिला : फिलिपाईन्समधील साखर उत्पादकांनी युरियाच्या वाढत्या किंमतीवर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता कमी होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. सरकारचा अन्न सुरक्षा कार्यक्रमावरही याचा परिणाम होऊ शकतो.
कन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स असोसिएशन इंकचे (कॉन्फेड) अध्यक्ष रेमंड मोंटिनोला यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी कृषी सचिव विल्यम डार यांना त्यंच्या एका एजन्सीवर त्वरीत कारवाईबाबत आभार व्यक्त करण्यात आली आहेत. यासोबतच खतांच्या किंमतीती निरंतर वाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. युरीयाचा दर सध्या P (पेसो) २००५ प्रती ५० किलो बॅगने विक्री केली जात आहे.

मोंटिनोला यांनी युरिया तसेच संबंधीत कृषी उत्पादनांसाठीच्या किंमतीत झालेल्या अभुतपूर्व वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, साखरेचे दर स्थिर आहेत. ऑक्टबर २०२२ पासूनआतापर्यंत खतांची किंमत P ८४५ प्रती बॅगवरुन P २,००५ प्रती बॅग म्हणजे दुप्पट झाली आहे. कॉन्फेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी इंधनासाठीचा खर्च केवळ P 30 प्रती लिटर होता, तो आता P 50 प्रती लिटरवर पोहोचला आहे. मजुरीचा खर्चही वाढला आहे. मोंटिनोला यांनी सांगितले की, अशीच स्थिती राहील तर पिंकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होईल. त्यामुळे देशाचा अन्न सुरक्षा कार्यक्रम अडचणीत येऊ शकतो. यावर विचार करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here