फिलिपाईन्स : साखर टंचाई कमी करण्यासाठी कारखाने लवकर सुरू करण्याचे निर्देश

मनिला : देशातील साखरेच्या टंचाई दूर करण्यासाठी Panay द्वीपकल्पावरील साखर कारखान्यांना पुढील हंगामात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इलोइलो ३ डिस्ट्रिक्ट बोर्डचे सदस्य मॅट पलाब्रिका यांच्याकडून साखर कारखाने लवकर सुरू करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या एका प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला. PANAY ISLAND वर तीन साखर कारखाने आहेत. यामध्ये Pasi City मधील सेंट्रल Azucarera de San Antonio (CASA) आणि सॅन अॅनरिकमध्ये युनिव्हर्सल रॉबिना कॉरपोरेशन-पासी (URC-PASSI) तसेच कॅपिजमध्ये कॅपिज शुगर सेंट्रल (सीएससी) यांचा समावेश आहे.

पलाब्रिका यांनी सांगितले की, शुगर रेग्यूलेटरी अॅडमिनिस्ट्रेशनने (एसआरए) २०२२-२३ मधील हंगाम सुरू होण्याआधी जवळपास ३,००,००० मेट्रिक टन साखरेची कमतरता भासेल, असे अनुमान जाहीर केले आहे. या अहवालानंतर तातडीने साखर आयात करावी अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, पलाब्रिका यांनी सांगितले की, साखरेच्या आयातीचा निर्णय हा स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असेल. पलाब्रिका म्हणाले की, साखर आयात केल्यामुळे स्थानिक साखरेच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा विपरित परिणाम होईल. गेल्यावर्षी बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here