फिलिपाइन्स : अन्न व पेय उत्पादकांना थेट साखर आयात करण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावाला विरोध

बॅकॉलॉड सिटी : नेग्रोस आयलंडमधील काँग्रेस प्रतिनिधी, वित्त सचिव बेंजामिन डायकोनो यांनी प्रस्तावित केलेली साखर आयात उदारीकरणाच्या विरोधात आहे. यातून अन्न आणि पेय उत्पादकांना थेट साखर आयात करण्याची परवानगी मिळेल. आपला हा प्रस्ताव देशातील साखर-गोड पेयांवर कर दर वाढवण्याच्या वित्त विभागाच्या प्रस्तावाचा एक भाग आहे, असे डायकोनो यांनी यापूर्वी सांगितले होते.

हाऊस रिझोल्यूशन ११९९ मध्ये, प्रतिनिधी जोसे फ्रान्सिस्को बेनिटेझ, जोसेफ स्टिफन पडुआनो, ग्रेग गासाटाया, गेरार्डो वाल्मेयर ज्युनियर, अल्फ्रेडो मॅरॉन III, ज्युलिएटा मेरी फेरर, एमिलियो बर्नार्डिनो युलो, मर्सिडीज अल्वारेस, मायकेल गोरीसेटा, जॉक्लीन लिम्काइचोंग आणि मॅनुअल सागरबारिया यांनी साखर आयातीच्या उदारीकरणामुळे देशांतर्गत साखर उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली आहे.

बेनिटेज म्हणाले की, साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी गोड पेयांवरील कराच्या माध्यमातून महसूल कमी करण्याचे आश्वासन देण्याऐवजी सचिव डायकोनो हे साखर आयातीच्या उदारीकरणाची ऑफर देत आहेत. स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा पाठिंबा न देता, साखर आयातीचे उदारीकरण केल्यास देशांतर्गत साखर उद्योग कमकुवत होईल, अशी भीती बेनिटेझ यांनी वक्त केली.

ते म्हणाले, अल नीनो आणि आमची मर्यादीत उत्पादन क्षमका यामुळे यावर्षी साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र, आमच्या साखर उत्पादकांना मदत करण्याऐवजी आमच्या बाजारात साखर आयातीवर भर दिल्यास देशांतर्गत साखर उद्योग संपुष्टात येईल. त्यांनी २०२१ ध्ये राष्ट्रीय आर्थिक आणि विकास प्राधिकरणाकडून सुरू केलेल्या अभ्यासाचा हवाला दिला. साखर व्यापार उदारीकरणाविरोधात त्यावर भर देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here