फिलिपाइन्स: राष्ट्रपतींकडून जादा साखर आयातीला मंजुरी

मनिला : फिलिपाइन्समधअये या वर्षी साखरेच्या स्थानिक उत्पादनातील घसरण लक्षात घेवून राष्ट्रपती फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी जादा साखर आयातीस मंजुरी दिली आहे. प्रेसिडेन्शियल कम्युनिकेशन ऑफिस (पीसीओ) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्कोस यांनी सोमवारी कार्यकारी सचिव लुकास पी. बर्सामिन आणि राष्ट्रपतींचे कायदा सल्लागार जुआन पोंस एनरिल यांच्यासोबत एसआरएच्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेतला. साखरेच्या अतिरिक्त आयातीमुळे दर स्थिर राहतील असे पीसीओने म्हटले आहे.

बैठकीदरम्यान, SRA ने म्हटले आहे की, या वर्षी देशात एकूण साखर पुरवठा स्थानिक शेतकऱ्यांकडून उत्पादित २.४ मिलियन मेट्रिक टन असेल. तर ४,४०,००० मेट्रिक टन आयात करण्याची परवानगी आहे. एसआरएच्या अनुमानानुसार, अपेक्षित पुरवठ्यातील तुट कमी करण्यासाठी देशात १,००,००० ते १,५०,००० मेट्रिक टन साखर आयात करण्याची गरज भासेल. मार्कोस यांनी बैठकीत सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस येणारा पुरवठा नेमका किती आहे हे निश्चित झाल्यावर किती आयात करायची याचे नेमके प्रमाण निश्चित केले जाईल. मार्कोस म्हणाले की, साखरेच्या स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने ऑगस्ट ते सप्टेंबर यांदरम्यान गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचा उद्देश हा आहे की, गाळपावेळी ऊस पूर्ण परिपक्व झालेला असेल आणि त्यामुळे अधिक साखरेचे उत्पादन होऊ शकेल.
राष्ट्रपतींनी एसआरएला छोट्या ऊस उत्पादनाच्या शेतांना कमीत कमी ३० हेक्टर ब्लॉक फार्मचे समायोजन करण्याच्या प्रक्रियेत गती आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आपले उत्पादन वाढवता येईल. अशा ब्लॉक फार्ममधील शेतकरी उत्पादन वाढीसाठी अर्थसाह्य आणि मशीनीकरणाच्या मदतीस पात्र ठरतील. सद्यस्थितीत देशात किमान ४० हेक्टरच्या सरासरी आकाराने २१ ब्लॉक फार्म आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here