फिलीपाइन्स: ला नीनाच्या प्रभावामुळे साखर उत्पादनात किरकोळ घसरणीची शक्यता

मनिला : हवामान बदल आणि शेतकऱ्यांनी अधिक फायदेशीर पिकांकडे आपला मोर्चा वळवल्याने यावर्षी फिलिपाईन्समधील स्थानिक साखर उत्पादनात २ टक्क्यांची घसरण होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तविलेल्या अंदाजानुसार, चालू हंगामात फिलिपाईन्समधील साखर उत्पादन गेल्या वर्षाच्या २.१५ मिलियन टनाच्या तुलनेत २.१४ मिलियन टन होईल अशी शक्यता आहे. यूएसडीएच्या एका अहवालात म्हटले आहे की, साखर उत्पादनातील घसरण मुख्यत्वे यावर्षीच्या ऑक्टोबर अथवा नोव्हेंबरमधील ला नीनाच्या प्रभावामुळे होईल. त्याचा ऊस उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे.

यूएसडीएने सांगितले की, फिलिपाईन्समधील उसाचे लागवड क्षेत्र गेल्यावर्षीच्या ४,०३,००० हेक्टरवरून घसरून ३,९०,००० हेक्टर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादनात घसरण दिसून येत आहे. मक्का, केळी आणि इतर पिकांच्या तुलनेत ऊसाच्या क्षेत्रात घट दिसून येत आहे. सरकारने ऊसाच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत करून चांगल्या प्रजातीचे बियाणे, सातत्यपूर्ण सुधारणा आणि नवतंत्रज्ञानाचा वापर या बाबींच्या माध्यमातून कृषी उत्पादकतेमध्ये सुधारणेचे पयत्न चालवले आहेत. साखर उत्पादनात अपेक्षीत तुट गृहीत धरून साखर व्यवस्थापनाने यावर्षी अमेरिकेला केला जाणारा निर्यात कोटा रद्द केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here