मनिला : शुगर नियामक प्रशासन (एसआयए) बोर्डाने या वर्षीच्या हंगामासाठी आपले साखर उत्पादन अनुमान घटवले आहे. एसआरए बोर्डाचे सदस्य – प्लांटर्सचे प्रतिनिधी पाब्लो लुइस अजकोना यांनी सांगितले की, बोर्डाने पिक वर्ष २०२२-२३ मध्ये कच्च्या साखरेचे उत्पादन १.८३१ मिलियन मेट्रिक टन (एमटी) पर्यंत पोहोचेल असे अनुमान वर्तविले आहे. हा आकडा गेल्या डिसेंबर महिन्यात जारी करण्यात आलेल्या १.८३४ मिलियन मेट्रिक टनाच्या पूर्व अंतिम पिक अनुमानापेक्षा थोडा कमी आहे. आपल्या पूर्व पिक अनुमानात साखर उत्पादन १.८७६ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
ते म्हणाले की, यावर्षी आम्ही, १.८३१ मिलियनच्या उत्पादनाची अपेक्षा करीत आहोत. मात्र, आमची मागणी त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, ४,४०,००० मेट्रिक टन साखर या वर्षाची तुट भरुन काढण्यासाठी योग्य आहे. एसआरए बोर्डाने आधीच यावर्षी एकूण कच्ची साखर उत्पादन २.०३ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याचे अनुमान व्यक्त केले होते. मात्र, नवे अनुमानसुद्धा, गेल्या पीक हंगामात केलेल्या १.८२ मिलियन मेट्रिक टन कच्च्या साखर उत्पादनापेक्षा अधिक आहे.