फिलीपाइन्स : साखर उत्पादन वाढले, घाऊक – किरकोळ किंमतीतही वाढ

मनिला : शुगर अथॉरिटी ॲडमिनिस्ट्रेशनने (एसआरए) सांगितले की, गेल्या महिन्यात चांगली वाढ नोंद केल्यानंतर फिलिपाइन्समधील साखर उत्पादनात विस्तार होत आहे. एसआरएकडील आकडेवारीनुसार कच्च्या साखरेचे उत्पादन १६ जानेवारी रोजी १०.२ टक्के वाढून ७,८९,६२८ मेट्रिक टन झाले आहे. गेल्या आठवड्यात हे उत्पादन ७,१६,४८५ मेट्रिक टन आहे. हे उत्पादन एक वर्षाच्या कालावधीत ७,६५,०२१ मेट्रिक टनापासून ३.२ टक्क्यांपेक्षा जास्त होते. एसआरएकडील आकडेवारीनुसार कच्च्या साखरेची सध्याचा घाऊक दर वार्षिक आधारावर P१,७०० प्रती LKg (५०-kilogram bags) वाढून P१,९५० प्रती LKg झाला आहे. प्रक्रिया केलेल्या साखरेबाबत पाहिले तर त्याचा दर P२,७०० प्रती LKg पासून वाढून P२,१५० प्रती LKg झाला आहे. कच्च्या साखरेचा सध्याचा किरकोळ दर P४५ प्रती किलो असा स्थिर राहिला आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या साखरेचा किरकोळ दर P५० प्रती किलोपासून वाढून P५४.५० प्रती किलो झाला आहे.

फिलिपाईन्समध्ये कच्च्या साखरेचा पुरवठा गेल्या वर्षीच्या आधारावर १.०२ मिलियनपासून १.०४ मिलियन मेट्रिक टन झाला आहे. कच्च्या साखरेची मागणी ५७७,६८७ मेट्रिक टनपासून १४.२ टक्के वाढून ६५९,५६८ मेट्रिक टन झाला आहे. देशात २६१,२०२.८ मेट्रिक टन प्रक्रिया केलेल्या साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या १७८,३५८ मेट्रिक टनापेक्षा हे उत्पादन ५० टक्के जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here